Thursday, December 27, 2012

“ असं का ? ”


मी म्हटलं “माझं तुझ्यावर प्रेम आहे”
तर ती म्हणाली “असं का?
हा काय प्रश्न झाला ?
मूडचा सगळा सत्यानास झाला
आता हे सगळं असंच होतं
तापवताना दूध सारखं फाटतचं जातं….

कासावीस जीवाला तृप्त होण्यास तिचा आवाज ऐकायचा असतो
तिचा  फोन मात्र सदैव out of range असतो...
रात्री मी किशोरचं romantic  गाणं गुणगुणतो फोनवर ...
ती जांभई देत म्हणते, “थकले आज, निजते बेडवर” ...
मी लिहिलेल्या गझलांचे msgs लगेच  delete होतात
आणि तिचे “Hmmm….lol… smileys….” पण Memory overload करतात

देवा हे असं का होतं ?
इकडे अश्रुंचे महापूर आणि तिकडे भावनांचा दुष्काळ का असतो ?
नास्तिक जरी असलो तरी तुझ्याकडे रोज तिची याचना करतो ...
पण कितीही “१६ सोमवार” केलेत तरी आमच्यासाठी शंकर “कैलासवासीच” ठरतो...

हि ओढ, हे प्रेम तिला कधी कळणार?
ह्या श्रावणीतरी मन मोराचा पिसारा का फुलणार?
Heart तिलाही असतं Heart मलाही असतं
Spelling  same असलं तरी प्रेम का same नसतं??

झालं ना गडे! किती हा अबोला,किती हा रुसवा?
एव्हढं ताणू नकोस, कधी माझीही समजूत घाल ना!
सांग कधी, “राजा, आठवणीच्या हिंदोळ्यावर तूच झोके घेत असतो,
गुलाबी स्वप्नात आपल्या प्रेमाचे उबदार घरटे बांधत असतो”

“हीर-रांझा, लैला-मजनूच्या जोडीला जरी नाव आपले नसेना,
पण प्रीतीच्या ह्या वेड्या झाडाला, समजुतीचे खत घालू या.”
राणी, गाठ जरी वर ठरली असेल तरी ती बांधायची इथे आहे,
पुष्कळ चाललो एकटे आता जोडीने मार्गक्रमण करायचे आहे!!!