Sunday, June 17, 2012

“बाप”माणूस


June चा तिसरा रविवार हा बऱ्याचश्या देशात पितृ-दिन अर्थात Father’s day म्हणून पाळला जातो. आपण मागील काही वर्षांपासून ह्याबद्दल जागरूक झालो आहोत. फ्याड म्हणा वा पाश्चात्यांचे अनुकरण. कारण काहीही असो, हा दिन आता भारतात हि मूळ धरत आहे. आणि मला ह्याचा आनंद आहे. माय-माउलीचा चहूकडे उदो-उदो होत असताना बापाला विसरून कसं चालणार?(सगळ्याच पाश्चात्य गोष्टी वाईट नसतात. :-p)

आपण भारतीय लोक “बापाला” माणूस म्हणून बघतच नाही. We want him to be like Arnold from “Terminator”. Always there to protect us but should never express emotions. आणि इथेच चुकतो आपण. आईसारखं थोड्या थोड्या गोष्टींवर तो आसवं गाळत नाही म्हणजे तो दुखावत नाही असं थोडीच आहे. त्याला रडून कसं चालणार? अख्खी जबाबदारी त्याच्यावर. कुटुंबाचा डोलारा सांभाळतो. मुळेच हादरु लागली तर वृक्ष तग धरेल काय? म्हणून तो धीरगंभीर राहतो. बालवयात वाटतं आपल्याला कि “My daddy is strongestपण शिंग फुटू लागली कि तो क्रूरकर्मा, “पूराने खयालात”वाला वाटतो. आपल्या मते तो आपल्याला समजूनच घेत नाही. पण कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला काय? बघा एकदा. तुम्हाला नारळासारखा भासेल. वरून रुक्ष पण आत शहाळं असलेला.प्रत्येक बाप हा मुलांसाठी धडपडत असतो. जे त्याला मिळाले नाही ते सर्व द्यायचा प्रयत्न करत असतो. दुर्दैवाने आपल्याला जाणीव होत नाही.

माझ्या पप्पांनी शिकत असताना पैश्यांची चणचण कधी भासू दिली नाही. ते कसे उभे करतील हा विचारच डोक्यात येण्यापूर्वी पैसे मिळत. पण ते करताना त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असेल हा कधी विचारच केला नाही. Never did I put myself in his shoes. लहानपणी मला surgeryला सामोरे जावं लागलं. तेव्हाची एक ठळकपणे आठवणारी गोष्ट म्हणजे, पावसात मला खांद्यावर घेऊन दवाखान्यांच्या फेऱ्या मारणारा बाप. नंतरपण ते जवळच होते. प्रत्येक औषध, इंजेक्शन वेळेवर. सकाळी सोयाबीनचे दुध आणायला जाताना घेतलेला walk. किंवा सायंकाळी नागपूरची रहदारी बघत मारलेल्या गप्पा आणि तो ५ रु. चा मोठ्ठा फुगा.

मी सर्व विषयांवर त्यांच्याशी चर्चा करतो. आपलं मत मांडतो. आणि ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक ऐकतात. बहुतेकदा माझी मते हि, ते ज्या पार्श्वभूमीतून आले आहे, त्यांना धक्का देणारेही असतात अन तरीही ते ऐकतात. कसलंही दडपण नाही. एक तात्पुरते उदाहरण. 1st yrला मी केस वाढवले होते. (जनावरच दिसत होतो.) आजी पप्पांना म्हणाली कि “केस कापायला सांगितले तरी केस कापत नाही.मुलगा हाताबाहेर चालला.” पण ते seriously काहीच म्हणाले नाही. कारण ठाऊक होतं कि हाताबाहेर जाणे हे फक्त केसापुरतेच मर्यादित आहे. आपल्या मुलावर विश्वास. दिलेल्या संस्कारांवर विश्वास. आठवणी भरपूर आहेत. शब्द अपुरे आहेत.

माझे पप्पा मोठे उद्योगपती नाही, राजकीय नेते नाही, अभिनेते नाहीत. तरीपण ते महान आहेत. मोठे आहेत. त्यांचे मोठेपण त्यांच्या साध्या राहणीमानात आहेत. Never seen a man who is so humble. वडील म्हणून आदर आहेच. पण मी त्यांचा आदर करतो ते त्यांनी केलेल्या संस्कारामुळे. आणि संस्कार ह्या शब्दाचा अर्थ मला रूढार्थाने जो प्रसिद्ध आहे तसला अभिप्रेत नाही. त्यांनी मला “विचार करण्याचे” संस्कार/स्वातंत्र्य दिले. चांगलं वाईट ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले. ते देताना जबाबदारीची जाणीव पण करून दिली. मी आज मोठी स्वप्ने बघण्याचे धाडस करतो त्याचे श्रेय त्यांना. मी जे काही छोटे मोठे निर्णय घेतले त्याला पूर्ण पाठबळ.

“स्वामी तिन्ही जगाचा” आईविना भिकारी आहे. पण बापाविना पण तो तेवढाच करंटा आहे. त्याच्यासाठी एक दिवस का साजरा होऊ नये? सांगू या त्यांना कि , “बाबा” रे, तू नसतास तर मी हि नसतो. शब्दशः.

Love you pappa. You are my hero!


Dedicated to my father!



3 comments:

  1. As always a great one Bujone Saheb!!!
    Perhaps next year you would have someone to wish you Happy Father's Day!!! :P

    ReplyDelete
  2. Nice 1 bhai.....it seems u r improving greatly.....

    ReplyDelete